पं.संजय गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली होतोय २४ वर्ष अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार
पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
ब्रम्हनाद कला मंडळ आणि धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान तर्फे २४ वा ब्रम्हनाद संगीत महोत्सव शनिवार आणि रविवार दिनांक १९आणि २० एप्रिल रोजी धायरीतील कै बंडोजी खंडोजी चव्हाण विद्यालयातील राजमाता जिजाऊ माॅसाहेब बहुउद्देशीय सभागृहात हा महोत्सव सायंकाळी साडेपाच ते दहा या वेळात संपन्न होणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
या महोत्सवात पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम युवा शास्त्रीय गायक गंधार देशपांडे यांचे शास्त्रीय गायन तसेच पं.सुधीर नायक यांचे एकल हार्मोनियम वादन आणि किराणा घराण्याच्या खतनाम गायिका विदुषी पदमाताई देशपांडे यांचे गायन होणार असून दुसऱ्या दिवशी युवा गायक सुरंजन आणि शुभम खंडाळकर तसेच राजश्री पाठक आणि या महोत्सवाची सांगता पं. संजय गरुड यांच्या गायनाने होणार असून त्यांना साथ संगत पं.अरविंद कुमार आझाद रोहन पंढरपूरकर ऋषिकेश जगताप उदय कुलकर्णी तुषार केळकर माधव लिमये माऊली फाटक आणि ज्ञानेश्वर दुधाणे आदी मान्यवर करणार आहेत.
तरी चोखंदळ पुणेकर रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन ब्रह्मनाद कला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पं.संजय गरुड यांनी केले आहे