पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी आदमापूर येथील प्रसिध्द संत श्री बाळु मामा ची भाकणूक (भविष्य वाणी) करण्याचा मान असणारे गुरू माऊली कृष्णा डोणे ( वाघापुरे) महाराज यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
त्यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गुरू माऊली कृष्णा डोणे ( वाघापुरे)महाराज यांचा सन्मान मंदिरे समितीचे सदस्य व शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा उपरणे व दैनंदिनी देवून सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.