पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्य परिवहन महामंडळातर्फे सोलापूर जिल्ह्यात *प्रवासी राजा दिन* या उपक्रमाचे नियोजन केले असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा, सुविधांमधील अडचणी,समस्या,तक्रारी व सुचना ऐकून घेऊन जिल्हास्तरावरील अधिकारी व आगार प्रमुखांनी उपस्थित राहून तक्रारींचे निराकरण करावे व सेवेतील त्रुटी तातडीने दूर कराव्यात असे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक आगारात एका बुधवारी प्रवासी राजा या उपक्रमाचे नियोजन केलेले आहे, यावेळी जिल्हास्तरावरील एस टी चे अधिकारी व संबंधित आगार प्रमुख उपस्थित राहून अडचणीचे निराकरण करणार आहेत.
तरी प्रवाशांनी,प्रवासी ग्राहक संघटनांनी आगारानिहाय बुधवारी दु ११ते १ यावेळेत संबंधित आगार प्रमुख कार्यालयामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन महामंडळाचे सोलापूर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी,अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा संघटक दीपक इरकल,सचिव सुहास निकते,जिल्हा महिला प्रमुख सौ. माधुरी परदेशी,सदस्य अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापूरकर केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील
*प्रवासी राजा दिन- प्रत्येक आगारनिहाय - बुधवार*
२३/४/ पंढरपूर
०७/५/ बार्शी
१४/५ अक्कलकोट
२१/५ करमाळा
२८/५ अकलूज
०४/६ सांगोला
११/६ कुर्डुवाडी
१८/६ मंगळवेढा