पंढरपूर प्रतिनिधी
शेळवे येथील सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सनराईज फेस्टिवलची सांगता राज्यस्तरीय सनराईज साहित्य पुरस्कार वितरणाने करण्यात आली, सदर पुरस्कार माढा मतदार संघांचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील, सांगोला मतदार संघांचे मा. आमदार शहाजी बापू पाटील यांचे चिरंजीव दिग्विजय पाटील, मा. जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, दै.पंढरी भूषणचे संपादक शिवाजी शिंदे, आयुर्वेदाचार्य डॉ. आबासाहेब रणदिवे, डॉ.सतिश माने, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष सौ.वर्षा शिंदे, व्हिजन वार्ताचे संपादक प्रवीण नागणे, सेवानिवृत्त सैनिक किरण पाटील, तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे, प्रभात न्यूज चे संपादक सुरज कौलगे, बोल भारी न्यूज चे संपादक मारुती नाईकनवरे, शेळवे गावचे सरपंच अनिल गाजरे, मा.उपसरपंच किरण दादा गाजरे, खेडभाळवणी चे उपसरपंच शहाजी पाटील, देवडे गावचे सरपंच सोमनाथ झांबरे तसेच श्री.विठ्ठल सह. सा.कारखान्याचे संचालक साहेबराव नागणे, विठ्ठल नाना रणदिवे,धनंजय काळे, नवनाथ नाईकनवरे, सिद्धेश्वर बंडगर तसेच गणेश ननवरे इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
पारावरच्या गोष्टी- लेखक- शेखर खंडेराव फराटे, शिरूर, पुणे
दस्तऐवज - कवयित्री- अनघा तांबोळी, मुंबई
काळीजकळा- लेखक- डॉ.श्रीकांत पाटील, कोल्हापूर
भुईपाश - लेखक - अशोक कोकाटे, कोल्हापूर
दौशाड ( आत्मकथन)- लेखक- डॉ. नंदकुमार राऊत, माण, सातारा
ब्युटी ऑफ लाईफ (चरित्र) सौ.आशा नेगी, पुणे
तर साहित्यात दीर्घ लेखन करणारे जेष्ठ साहित्यिक- कल्लापा पाटील ( चंदगड ) यांना विशेष सनराईज साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले... शाल,श्रीफळ, रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन लेखकांना सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरणानंतर माढा मतदारसंघाचे दबंग आमदार अभिजित पाटील यांच्या शुभहस्ते दीप प्रज्ज्वलन आणि नटराज मूर्ती पूजन करून कार्यक्रमांची सुरवात करण्यात आली,कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून संस्थेचे अध्यक्ष समाधान तुकाराम गाजरे यांनी संस्थेच्या दशक पूर्ती बद्दल जुन्या आठवणींना उजाळा दिला,बरोबर दहा वर्षांपूर्वी युवा उद्योजक म्हणून ध्वजरोहणासाठी आलेले अभिजित पाटील आज प्रशालेच्या दशकपूर्ती महोत्सवास आमदार अभिजित पाटील म्हणून उपस्थित असून हा सनराईज परिवाराचा सद्गुण आहे,ज्यांचे पाय सनराईज ला लागले, ते आयुष्यात खूप यशस्वी झाले, दहा वर्षांपूर्वी आबांच्या शुभहस्ते मैदानावर लावलेल्या विविध झाडांचा आता वटवृक्ष झालेला आहे,तशीच आपली संस्था यशोदा प्रतिष्ठान हि,सनराईज पब्लिक स्कूल पासून शून्यातून संघर्षमय प्रवास करत ज्युनिअर कॉलेज पर्यंत विस्तारली असून प्रशालेत तालुक्यातील पहिला सैनिकी प्रशिक्षण कोर्स सुरु झालेला आहे, अगदी सुरुवातीपासून वक्तृत्व, कला,क्रीडा,स्पर्धा परीक्षा इत्यादी क्षेत्रात संस्थेने नवनवीन विक्रम तयार केले असून प्रशालेच्या प्रत्येक जडणघडणीत दमदार आमदार अभिजित पाटील यांचा खूप मोठा हातभार आहे,आमदार साहेबांचे वेळोवेळी मार्गदर्शन असून,जिथं कमी तिथं आम्ही या भूमिकेत आमदार अभिजित पाटील उर्फ आबासाहेब खंबीरपणे सोबत असल्याच्या भावना प्रस्ताविकात व्यक्त केल्या.
आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपण स्वतःसनराईज पब्लिक स्कूल शेळवे च्या संघर्षाचे तसेच यशाचे साक्षीदार असल्याचे सांगून ध्येयाने झापाटलेलेल्या माझ्या तीन सर्वसामान्य घरातून आलेल्या सहकाऱ्यांनी अगदी हालाकीच्या परिस्थितीत,अतिव संघर्षातून हे रोपट उभा केल्याचे सांगितले,सनराईज पब्लिक स्कूल नेहमी नाविण्याच्या शोधात असते,स्पर्धा परीक्षेत या शाळेचा हातखंडा असून कित्येक मुलं शिष्यवृत्ती, एन एम एम एस,पिटीएस सारख्या परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले असून आतां तर देशसेवे साठी आवश्यक सैनिकी स्कूल प्रशिक्षण कोर्स प्रशालेने सुरु केला आहे,हि ग्रामिण व शहरी भागातील मुलांसाठी अत्यंत फायद्याची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले,सनराईज पब्लिक स्कूल चा आदर्श सरकारने ही घ्यावा अशी ही प्रशाला आहे, येथील मुलं आयुष्याच्या स्पर्धेत कुठेही कमी पडणार नाहीत,तसेच प्रशाला राज्यस्तरीय सनराईज साहित्य पुरस्कार देत असताना साहित्याचा चौफेर विचार करून देत असल्याचे त्यांनी सांगितले, स्वतः कॅन्सर ग्रस्त महिला जी अनेक कँसर ग्रस्त व्यक्तींची जगण्याची प्रेरणा बनते, दौशाड सारखे आत्मकथकन, बाल साहित्य,चरित्र, ललित अशा क्षेत्रात पुरस्कार देऊन साहित्यिकांचे मनोबल तर वाढवतेच आहे, तसेच परिसरातील नुकतेच सैन्यदलात व प्रशासकीय सेवेत भरती झालेले यश नागणे,इंडियन आर्मी मध्ये भरती झालेले गणेश साळुंखे,विनायक पाटील यांचाही आमदार अभिजित पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.., सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हापरिषद सदस्य भारत आबा शिंदे यांनीही आपल्या भाषणातून प्रशालेचे कौतुक केले, ज्यांना पुरस्कार मिळाला आहे असे आय ए एस अधिकारी नंदकुमार राऊत यांनी ही साहित्य व शिक्षण यांची जोडी जमली की आयुष्य यशस्वी होते असे सांगून यशोदा प्रतिष्ठान चे कौतुक केले.
स्वतः कँसर ग्रस्त असून हजारो कँसर ग्रस्त लोकांच्या आयुष्याला नवी दिशा, प्रेरणा आणि ऊर्जा देणाऱ्या अशा नेगी यांनीही कँसर सोबतचे आपलं नाते पटवून सांगितले कॅन्सर ग्रस्त लोकांना प्रेरणा दिली.
मेजर किरण पाटील यांनी आपल्या मनोगतातून देशसेवा, सैनिकी प्रशिक्षण याचे महत्व पटवून सांगितले,
कार्यक्रमचे सूत्रसंचालन करत असताना संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी आमदार अभिजित पाटील यांच्याकडे मुलांना येण्याजाण्यासाठी पक्क्या पुलाची, ओपन जिम ची मागणी केली, तो शब्द आमदार साहेबांनी लगेच झेलून तिथेच पूल आणि जिम चे काम लवकरच सुरु करण्याचे आश्वासन दिले,त्यामुळे विद्यार्थी व पालकांमधून प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आबा नेहमीच तत्पर असतात,आजही त्यांनी सर्व पालक, विद्यार्थी व मान्यवरांच्या सोबत सनराईज फेस्टिवल चा आस्वाद घेऊन, मुलांच्या परफॉर्मन्स साठी शुभेच्छा व प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी केले, तर संपूर्ण शिक्षक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली.