पंढरपूर प्रतिनिधी रामेश्वर कोरे तेज न्यूज
शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांना मिळाव्यात या उद्देशाने कार्य करीत असलेल्या अनुलोम या सामाजिक संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात समरसता महाकुंभ तीर्थ कलश पूजन सोहळे मोठ्या थाटात संपन्न होत आहेत.
नुकताच पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील इंदिरा महिला सोसायटी मध्ये हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.सर्वप्रथम दिंडी काढून महाकुंभ कलशाचे स्वागत केले,यामध्ये हरी भक्ती परायण बोरसे महाराज यांनी अभंग घेत सोसायटी मधून प्रदक्षिणा पूर्ण केली.यावेळी बहुसंख्य महिला,पुरुष,शाळकरी मुले सहभागी झाली,त्यानंतर निर्मले महाराजांनी मोठ्या भक्तिभावाने पौरोहित्य केले ,जमलेल्या बहुसंख्य जोडप्यांनी एकत्रित पूजन आणि आरती केली,मंत्रपुष्पांजली होऊन प्रसाद वाटप करण्यात आले
कुंभमेळ्या बाबत माहिती अनुलोम चे भाग जनसेवक रामेश्र्वर कोरे यांनी दिली
वरील सोहळा यशश्वी होण्यासाठी राष्ट्रीय भारुडकर चंदाताई तिवाडी,मंगेश देशपांडे सर,विकास पुजारी, शाम फुलारे,संपूर्ण साखी परिवार यांनी विशेष प्रयत्न केलेया सोहळ्याची चर्चा संपूर्ण शहरात होत होती.