करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
शेतकरी राजाच्या कष्टाने प्रतिकूल परिस्थितीत पिकविलेल्या द्राक्षां पासून बनविलेल्या बेदाण्याला आज वाफळकरवस्ती वरील प्रगतशिल बागायतदार आकाश वसेकर आणि बिभीषण वसेकर पंढरपूर येथील लिलावात अनुक्रमे ५११-४११विक्रमी भाव मिळाला.
त्यामुळे द्राक्ष शेतकरी उत्पादनांमध्ये एक चर्चेचा विषय ठरला असून.वर्षभर राबराब राबत असलेल्या शेतकरी राजाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत.आहे.वाफळकरवस्ती वरील जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या द्राक्षांच्या बागा आहेत.
दिवसभर कष्ट करत वर्षातून एकदा येणाऱ्या पिकाला जिवापाड संभाळत कधी द्राक्षावर पडणाऱ्या रोगाची काळ्जी.तर कधी पाणी टंचाई.दूष्काळाची काळजी तर कधी कामगारांची टंचाई यातून मार्ग काढत काढत आलेल्या द्राक्षापासून बनविलेल्या बेदाण्याला विक्रमी ५११-४११ दर मिळाल्याने आणखी जोमाने चांगलं कष्ट करण्याची उर्जा निर्माण झाली आहे असे आकाश वसेकर आणि बिभीषण वसेकर यांनी सांगितले.
आज बेदाण्याला मिळालेला ५११ चा भाव केलेल्या कष्टाच चीज झालं असल्याचे सांगत आता पूढील काळात ही उत्तम दर्जाचा बेदाणा तयार करण्यासाठी आणखी जोमाने काम करण्याची संधी विक्रमी मिळालेल्या बेदाण्याच्या भावानं मिळाली आहे
आकाश वसेकर वाफळकरवस्ती