*मराठी पाऊल पडते पुढे.....*
*शेतीला कुठे नाही पाणी,पाणी आहे पण तिथे वीज नाही.विज व पाण्यासाठी रात्रीचा दिवस केला...माल आला पण भाव गेला....*
म्हणे मराठी पाऊल पडते पुढे...
*शेती परवडत म्हणून केला दुधाचा जोडधंदा...दुधाचा दर पाडून मंडळी तुम्ही केलाय जगण्याचा वांदा.....*
म्हणे मराठी पाऊल पडते पुढे...
*पैसा नाही पाणी नाही शाळेत मुले धाडू कशी....तुमची मुले परदेशी..... आमच्या वाट्याला मात्र देशी...*
म्हणे मराठी पाऊल पडते पुढे...
*तुम्ही बदला तासा तासाला सुट बुट... आम्ही मात्र मुलाला देऊ शकत नाही बोरकुट*
म्हणे मराठी पाऊल पडते पुढे..
*इथे गल्ली बोळात निर्माण झाले तुम्ही पाळलेले डाॅन....आमची छाटली तरी मान.... आम्ही म्हणतो मेरा भारत महान..*
म्हणे मराठी पाऊल पडते पुढे
*चौका चौकात एकच दंगा..कोण किती खाण्यात दंग..तरी सर्वांनी सर्वांनीच घेतलेय झोपेचे सोंग..*
म्हणे मराठी पाऊल पडते पुढे...
*पोलिस दादा..दादा राहिलाच नाही...कारण तुमच्या आदेशानुसार तो चालतोय चाल....*
म्हणे मराठी पाऊल पडते पुढे..
श्री.आनंदा आलदर ✒️ 9765066247