पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर सिंहगडच्या आठ विद्यार्थ्यांची नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये महापारेषण आणि महावितरणमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रा. डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अभिनंदन पर सत्कार महाविद्यालयामधील विद्युत अभियांत्रिकी विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या महाविद्यालयामधील विद्युत अभियांत्रिकी विभागामधील एकूण आठ विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या महापारेषण आणि महावितरण विभागामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये सिलेक्ट झाले असून हे स्पर्धा परीक्षेतील मोठे घवघवीत यश असून त्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.शिवशंकर कोंडरु, प्रा.अंजली चांदणे, तसेच इतर शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
यावेळी निवड झालेले 8 विद्यार्थ्यांमध्ये अरविंद आयरे, अरुण पवार, संध्यारानी तवटे, विक्रम भोसले, योगेश बाबर, अण्णासाहेब ताठे, दीपक ताठे आणि महेश म्हेत्रे यांचा समावेश होता.
शिक्षकांच्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांनी आपले आभार व्यक्त केले. त्यानंतर वरील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना गर्व्हनमेंट सेक्टर मधील महत्त्व पटवून देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले.
या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षातील विद्युत अभियांत्रिकी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या संधी कशा मिळवाव्यात याबद्दल दिशा देण्याचे कार्य केले.
हा कार्यक्रम यशस्वी जोशी करण्यासाठी विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.शिवशंकर कोंडरु, प्रा.अंजली चांदणे, प्रा. विनोद मोरे, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ.भालचंद्र गोडबोले, डॉ.अल्ताफ मुलाणी, डॉ.श्रीगणेश कदम, डॉ. अनिल निकम, प्रा.नामदेव सावंत तसेच इतर शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रद्धा पंधे आणि वैष्णवी जाधव (पाटील) यांनी केले तर आभार प्रदर्शन स्पर्धा परीक्षा सेलचे प्रमुख प्रा. अभिजीत सवासे यांनी केले.