पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
16 वी मिनी सब ज्युनिअर राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा डेरवण जि . रत्नगिरी येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये अर्णव माणिक मासाळ याने वैयक्तिक रौप्य पदक व सांघिक सुवर्ण पदक मिळविले आहे.त्याची 26 मार्च 2025 रोजी गुंटूर आंध्रप्रदेश मध्ये सुरू होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात त्याची निवड झाली आहे .
तो सध्या दृष्टी आर्चरी ॲकडमी , सातारा येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रविण सावंत व शिरिष ननवरे यांच्या मार्गदर्शना खाली धनुर्विद्येचे प्रशिक्षण घेत आहे.
दृष्टी आर्चरीचे अध्यक्ष राजेश देशमुख , उपाध्यक्ष महेंद्र कदम व सचिव सायली सावंत यांनी अर्णवच्या या उज्ज्वल यशासाठी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा दिल्या.