भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील राजवली तोफीक तांबोळी वय 7 इयत्ता दुसरी या मुलाने मुस्लिम धर्मातील पवित्र असा रमजान महिन्यातील पहिलाच रोजा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील रोजास नुकतीच सुरुवात झाली आहे रविवारी रोजातील पहिलाच दिवस होता हा रोजा मुस्लिम धर्मातील लहान चमकल्यापासून ते आबाल वृद्धापर्यंत केला जातो
या पवित्र रमजान महिन्यात रोजेदार बांधव पहाटे सूर्योदयापूर्वी सहेरी करून पूर्ण दिवस अन्न पाण्याविना राहून अल्लाची इबादत करतात तसेच सूर्यास्ताच्या वेळी अल्लाहाच्या साक्षीने पेंडखजुरीने रोजा सोडतात हा सहेलीचा व इफ्तारचा कालावधी जवळपास 14 तासाचा होतो. रोजदार मुस्लिम धर्माचे पवित्र धर्मग्रंथ कुराण शरीफ चे पठण करतात दिवसातून पाच वेळेस नमाज पडतात. त्यामुळे या कडक उन्हाळ्यात रोजेदार बांधवांचा चांगलाच कस लागणार आहे.
या राजाअली च्या यशस्वी रोजाबद्दल हापीसाब व सर्व ज्येष्ठ रोजीकरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच त्याचे तेज न्यूज चॅनल परिवाराकडून अभिनंदन केले आहे.