पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
क्षत्रिय महासंघाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष महेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघा च्या प्रयत्नांना यश आले असून पंढरपूर येथील संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या स्मारकाची जागा महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित झालेली आहे. सदर जागेचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले व शिंपी समाजांच्या अनेक वर्षांच्या मागणीला न्याय मिळवून दिला.
सन २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाने पंढरपूर येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे स्मारकासाठीचा प्रस्ताव मंजूर केलेला होता. परंतु तेव्हापासून आत्तापर्यंत सदर स्मारकाच्या जागेचा प्रश्न हा प्रलंबित होता. तत्कालीन क्षत्रिय महासंघाचे प्रदेशाध्यक्ष महेश ढवळे व त्यांचे सहकारी यांनी दिनांक ६/९/२०२३ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे तसेच दिनांक ३०/१०/२०२३ रोजी चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेटीतून पाठपुरावा केलेला होता. परिणामी दिनांक ३०/१०/२०२३ रोजीच चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सदर स्मारकाच्या जागेचा प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी प्रयत्न केले होते.
क्षत्रिय महासंघाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष महेश ढवळे यांनी महासंघाच्या दिनांक १२/१२/२०२४ रोजी घेतलेल्या बैठकीत त्यासंबंधीचे ठराव देखील मंजूर करून घेतले होते.
तत्कालीन क्षत्रिय महासंघ व महाराष्ट्रातील सर्व शिंपी समाज यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी महेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथे दिनांक २७/१२/२०२४ रोजी शिंपी समाजाची एकत्रित बैठक घेण्यात आली व हा विषय चर्चेतून सोडण्याबाबत एकमत झालेले होते. दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी महेश ढवळे यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या शिष्टमंडळाने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेऊन सदर जागेसाठी सविस्तर चर्चा केली होती. व दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी पंढरपूर प्रांत अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर शिष्टमंडळाने त्या जागेची पाहणी केली होती. याचबरोबर महेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एक संघाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांचीही भेट, घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी विनंती केली होती. महेश ढवळे यांच्या नेतृत्वाखालील एकसंघाच्या सदरच्या अनेक प्रयत्नांना यश मिळाले असून पंढरपूर येथील रेल्वे बोर्डाची जागा संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या स्मारकाच्या बांधणीसाठी महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.
सदर स्मारकाच्या जागेचा प्रलंबित प्रश्न सुटावा यासाठी अनेकांनी अनेक वेळेला यापूर्वी प्रयत्नही केलेले होते. परंतु महेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकासंघाचा हा प्रश्न सोडण्यात सिंहाचा वाटा आहे, हे निर्विवाद सत्य आहे.
सदर शिष्टमंडळामध्ये संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांचे वंशज मुकुंद नामदास महाराज व माधव नामदास महाराज, नानासाहेब पाथरकर, महादेवराव खटावकर, रुपेशजी खांडके, धनंजय जंवजाळ, गणेश उंडाळे, मनोज भांडारकर, धनंजय गोंदकर, अशोकजी खैरनार, रेखाताई मुळतकर, प्रभू सोनवणे, सिद्धार्थ भांबुरे, महेश रेळेकर तसेच पंढरपूर व सोलापूर येथे समाज बांधव वगैरेंचा सहभाग होता.