भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी या महाविद्यालयाचे कलाशिक्षक देवानंद गोंजारी यांच्या सेवापुर्ती निमित्त तेज न्यूज चैनल च्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य व स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजी राजे शिंदे यांच्या हस्ते देवानंद गोंजारी यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सह पत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी गावचे उपसरपंच नितीन शिंदे उपस्थित होते.
यावेळी संभाजी शिंदे म्हणाले की , कलाशिक्षक देवानंद गोंजारी यांनी येथे गेले तेरा वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली आहे त्यांनी येथील विद्यालयाच्या बोलक्या भिंती हा प्रकल्प राबविला आहे. शासकीय ग्रेड परीक्षा विशेष मार्गदर्शन . कर्मवीर जयंती सोहळ्यासाठी विविध प्रकारच्या प्रतीकृती ( गेट वे ऑफ इंडिया , मोर , चंद्रयान , कल्याण दरवाजा , होडी, हत्ती , ज्ञानकलश इ ) 'करण्यासाठी हातखंड होता. कला शिक्षक गोंजारी यांना विविध शैक्ष , व सामाजिक संस्थानी अनेक पुरस्कार देऊन गौरविणेत आले. ५ सप्टेंबर २००२ रोजी जिल्हा परिषद सोलापूर चा आदर्श शिक्षक पुरस्कार ही मिळाला आहे . त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करून उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा शिंदे यांनी दिल्या.
यावेळी देवानंद गोंजारी म्हणाले की ,मी अत्यंत प्रामाणिकपणाने माझी कला विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचे कार्य केले आहे त्याच विद्यार्थ्यांनी सहकार्य करून उत्तम असे यश संपादन केले आहे.मी शाळेच्या कोणत्याही प्रकारच्या मदतीस ,सहकार्यास तयार आहे. असे हि गोंजारी म्हणाले.
यावेळी सर्वांचे आभार संपादक प्रशांत माळवदे यांनी मानले.