शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
शेळवे येथील सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला,मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने प्रशालेत सुप्रसिद्ध व्याख्यात्या तसेच ए.बी मराठी न्यूज चैनलच्या कार्यकारी संपादिका पूजा खपाले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.खेड-भाळवनी गावचे मा. सरपंच शरद पवार व प्रगतशील बागायतदार समाधान पवार कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,प्रशालेत मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी कविता वाचन,कविता गायन आणि स्वरचित कविता असे विविध उपक्रम साजरे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवर व व्याख्यात्या पूजा खपाले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी पूजा खपाले म्हणाल्या की विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले,"यश मिळवण्यासाठी प्रयत्नांमध्ये सातत्य हवे,जिद्द आणि चिकाटी हवी असे प्रतिपादन त्यांनी केले,"'कोणत्याही क्षेत्रात गेला तर सदसद विवेकबुद्धी,कुतूहल व चौकसबुद्धी आपल्याला यशापर्यंत घेऊन जाऊ शकते',असे हि त्यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक योगेश गायकवाड यांनी केले,मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक सचिव,युवा ग्रामिण साहित्यिक,अनवानिकार अंकुश गाजरे यांनी मराठी भाषा दिनाचे महत्व पटवून सांगितले,तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी परिश्रम घेतले.प्रशालेच्या सहशिक्षिका गीतांजली बाबर, तृप्ती कोरे तसेच सिरत शेख यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,ए.बी मराठी न्यूज चॅनेल्स चे मुख्य संपादक गणेश गायकवाड यांचा सन्मान करून व सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .