पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर शहर पोलीस ठाणे ठाणे गु.र.नं.७३०/२०२४ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल आहे. सदरचा गुन्हा हा पंढरपुर शहरातील सरगम चौक येथे असलेल्या एच.डी.एफ.सी. बँकेच्या बाहेर घडला असुन यातील फिर्यादीची पैशाची बॅग ही चोरीला गेली होती.
त्याप्रमाणे तपास केला असता सदरचा गुन्हा करणारे आरोपी हे कपारलाटिप्पा पोस्ट बिटरगुंटा ता कावली नि वेल्लोर राज्य आंध्र प्रदेश येथील असल्याची खात्री झाली होती. सदर आरोपींतांच्या मागावर पोलीस होते. त्या टोळीतील काही आरोपी हे आंध्र प्रदेश मधुन निघाले असुन ते सोलापुर जिल्हयात येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली असल्याने त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सापळा रचुन गुन्हयातील दोन संशयीत आरोपींना गुन्हा करते वेळी वापरलेले दोन्ही मोटार सायकलीसह ताब्यात घेतले आहे. त्यांचेकडुन चोरी करण्या करीता वापरले जाणारे काही संशयीत वस्तु मिळुन आले आहेत. तसेच गुन्हयात चोरीस गेलेल्या रकमेपैकी ३,००,०००/- रू जप्त करण्यात आलेले आहे.
मिळुन आलेल्या दोन्ही आरोपींना अटक केली असुन त्यांची नावे
१) योहान प्रसाद गुड्डेटटी वय ४६ वर्षे धंदा मजुरी,
२) रवि नागराज नायडु वय ४९ वर्षे धंदा मजुरी
दोघे राहणार कपारलाटिप्पा पोस्ट बिटरगुंटा ता कावली जि वेल्लोर राज्य आंध्र प्रदेश
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोसई श्री राजेश गोसावी, सपोफौ शरद कदम, सपोफौ कल्याण ढवणे, पोह ३९६ सुरज हेंबाडे, पोह ३९८ सिरमा गोडसे, पोह २२१ प्रसाद औटी, पोह १७८९ सचिन हेंबाडे, पोह १२५५ विठ्ठल विभुते, पोना १७३६ इंगळे, पोकॉ १९०४ निलेश कांबळे, पोशि १२१६ शहानी मंडले, पोशि २१९० समाधान माने, पोकॉ १५१३ बजरंग बिचुकले, चालक पोका ५०३ बडे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पोशि रतन जाधव यांनी केली आहे.