पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा.ली. नंदूर या साखर कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांच्या संकल्पनेतून कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी कामगार व कारखान्यातील कर्मचारी यांच्यासाठी क्षयरोग व सर्व रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या प्रारंभी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके व कार्यकारी संचालक मोहन पिसे यांच्या हस्ते माघी गणेश जयंती निमित्त श्री.गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबिराला सुरवात करण्यात आली.
शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या ऊसतोड कामगार व कर्मचारी यांचे आरोग्य सदृढ आणि सक्षम होण्यासाठी आशा आरोग्य उपक्रमांचे नितांत गरज असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी चटके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. कारखानदारी कार्यक्षेत्रामध्ये आपली व्यावसायिक जबाबदारी पार पाडत असताना समाजातील विधायक कार्यक्रमांना गतिमान करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे उपक्रमाचे कारखाना मार्फत वेळोवेळी आयोजन केले जाते असेही त्यांनी आवर्जून यावेळी नमूद केले. या शिबीरात ३५५ कारखाना कामगार, ऊस तोडणी मजुर व त्यांचे बालक यांची आरोग्य तपासणी झाली. या शिबीरासाठी डॉ.श्री डी.जी शिंदे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. श्री नंदकुमार शिंदे (वैद्यकीय अधिकारी), डॉ अरुणकुमार महिंद्रकर (अस्थीरोग्य तज्ञ), डॉ. श्रेयश जाधव (एम.डी मेडीशियन), डॉ. गौरीशंकर बुगडे, डॉ.महेश माळी, डॉ.सिद्राया बिराजदार, डॉ. आनंद हत्तरसंग तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आरोग्य सेवक यांनी आपली समाजाभिमुख कर्तव्य सेवा पार पाडत असताना अतिशय समर्पक भावनेने सर्व कर्मचारी व कामगारांची तपासणी करून योग्य तो आरोग्यविषयक सल्ला दिला.
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे,माजी संचालक भारत निकम, सरव्यवस्थापक(टेक्नीकल) सुहास शिनगारे, चिफ केमिस्ट मोहन पवार, एच आर मॅनेजर डी. बी. बळवंतराव, डिस्टलरी मॅनेजर संभाजी फाळके, चिफ अकोंटंट बजीरंग जाधव, शेती अधिकारी राहुल नागणे, उपशेती अधिकारी तोहीद शेख, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे, ईडीपी मॅनेजर निलेश रणदिवे, सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड उप सुरक्षा अधिकारी रणजीत पवार आदी मान्यवर सहकारी तसेच सर्व कारखाना प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी, खाते प्रमुख, कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.