पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथे कन्या सप्ताह निमीत्त मुलगी वाचावी, मुलींची शालेय प्रगती होण्यासाठी जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी पढाव बेटी बचाव व स्त्रीभ्रूणहत्या याबाबत सर्वसामान्य नागरिकांना याद्वारे प्रबोधन करण्यात आले.
सदर रॅलीमध्ये पंढरपूर तालुका पंढरपूर शहर पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे महिला अधिकारी महिला अंमलदार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चे अधिकारी व स्टाफ यांनी सदर बेटी पढाव बेटी बचाव रॅलीमध्ये सहभाग घेतला.पंढरपूर शहरातील स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, भोसले चौक, भादुले चौक, नाथ चौक, गांधी रोड येथून अत्यंत उत्साही वातावरणात रॅली काढण्यात आली.
मुलगी हा कुटुंबाला भार नसुन तीच अनेकदा कुटुंबाचा आधार ठरू शकते असा संदेश देण्यात आला.
नागरिकांना मुलगी जन्मल्याचा आंनंद व्यक्त करायला हवा, जुने बुरसटलेले विचार, संकुचित मानसिकता त्यागली पाहिजे, असा संदेश देण्यात आला.