माळशिरस प्रतिनिधी तेज न्यूज
MDTR USA हा विमा क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे हा पुरस्कार जगातील एकूण विमा प्रतिनिधी पैकी फक्त 1 टक्के विमा प्रतिनिधी मिळवू शकतात हा पुरस्कार सागर उरवणे यांनी सलग 3 वर्षे मिळवलेला आहे.
मागील 21 वर्षापासून सागर उरवणे यांनी ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा देत आत्तापर्यंत जवळपास 2 हजार ग्राहकांना विम्याचे छत्र प्रदान केलेले आहे. येणाऱ्या जून महिन्यात अमेरिका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमा परिषदेत ते सहभागी होणार आहेत अशी माहिती दिलेली आहे.
हा पुरस्कार मिळवण्यासाठी उरवणे यांचे विकास अधिकारी निकम , LIC अकलूज शाखेचे शाखाधिकारी अनोकार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व या पुरस्काराबद्दल LIC पंढरपूर शाखेचे शाखाधिकारी गुळवणी यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.