धाराशिव प्रतिनिधि तेज न्यूज
दि. ३०/१/२०२५ रोजी धाराशिव येथील मे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी दत्तात्रय साठे यांनी धनादेश अनादरीत प्रकरणी आरोपीस 3 महिने कारावास व 5 लाख रूपयांचा दंडासह 5 हजार रूपये खर्चाची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी संजय महादेव माने रा. येवती यांनी जयलक्ष्मी शुगर प्रॉडक्टस प्रा. लि. नितळी यांचे सोबत ऊस तोड वाहतुकीचा करार केला व जयलक्ष्मी साखर कारखान्याकडून वसंतदादा बँकेतुन रक्क्म रू. ४,५०,०००/- आगाऊ उचल घेतली. रक्कम उचल घेऊन ही उस तोड वाहतुक करार करून जयलक्ष्मी कारखान्यास उस वाहतुक केली नाही आणि जयलक्ष्मी साखर कारखान्यास अडचणीत आणले, त्यांनतर आरोपी कडे करारा प्रमाणे कारखान्याने काम न केल्याने रक्क्म परत मागितली असता, आरोपीने जयलक्ष्मी साखर कारखान्यास रक्क्म रु. ३,५०,०००/- चा चेक साल २०१३ साली दिला व चेक वटवून रक्क्म मिळेल अशी हमी दिली. सदर चेक वटण्यासाठी बँकेत जमा केला असता धनादेश खात्यावर पुरेशी रक्क्म नसल्याने अनादरीत झाला. त्यानंतर धनादेश अनादरीत झाल्याने जयलक्ष्मी कारखान्याद्वारे सुरेश भोरे यांना न्यायालयीन कामासाठी नेमले व सुरेश भोरे यांनी जेष्ठ विधिज्ञ ॲड. विजयकुमार शिंदे यांच्या तर्फे रक्कम मागणीची नोटीस आरोपीस दिली.
परंतु आरोपीने जयलक्ष्मी कारखाण्यास रक्क्म परत न दिल्याने ॲड. विजयकुमार शिंदे यांचे कडून कलम १३८ एन.आय. ॲक्ट प्रमाने सुरेश भोरे यांनी फिर्याद कोर्टात दाखल केली. पुढे सुरेश भोरे यांनी कारखाण्याचे काम सोडल्यावर फिर्यादी म्हणून संजय रामचंद्र दुबे यांनी प्रकरणात काम पाहिले. फिर्यादी तर्फे संजय रामचंद्र दुबे व वसंतदादा बँकेचे मॅनेजर मुंडे यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यानंतर ॲड. विश्वजीत शिंदे यांनी केलेला अंतिम युक्तीवाद ग्राहय धरून न्यायाधिश साठे साहेब यांनी आरोपी संजय महादेव माने यास तिन महिने कारावास व पाच लाख रूपये दंड आणि पाच हजार रूपये खर्च अशी शिक्षा दि. ३०/१/२०२५ रोजी सुनावली.
सदर प्रकरणात शिंदे लॉ फर्म यांनी फिर्यादी जयलक्ष्मी कारखान्यातर्फे न्यायालयीन काम पाहिले. प्रकरणात ॲड. विजयकुमार शिंदे व ॲड. विश्वजीत शिंदे यांना ॲड. अजित राठोड, ॲड. भाग्यश्री रणखांब, ॲड. ज्योती जगताप व ॲड. पृथ्वीराज दंडनाईक सह मोहरील पवन पांचळ यांनी सहकार्य केले.