पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या वतीने वेब तंत्रज्ञानावरील एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कैलाश करांडे , प्राचार्य, एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर उपस्थित होते. या सेमिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अनिकेत कांबळे, सिनियर डेव्हलपर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी वेब तंत्रज्ञानातील नवीन ट्रेंडस, अँप्लिकेशन डेव्हलपमेंट, फ्रंटएंड व बॅकएंड तंत्रज्ञान याबद्दल सखोल माहिती दिली.
तसेच विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचा उपयोग आणि महत्त्व स्पष्ट केले. या सेमिनारला महाविद्यालयातील 76 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या सेमिनारद्वारे नवीन तंत्रज्ञान शिकण्याचा अनुभव घेतला.
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. मनोज कोळी यांनी संपूर्ण सेमिनारचे नियोजन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.मनोज कोळी व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. तर विद्यार्थी प्रतिनिधी प्रतीक कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.