भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
वसंतराव काळे विद्यामंदिर भाळवणी येथे भारताचा ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी पंचायत समिती सदस्य सुरेशबापु देठे व प्रमुख पाहुणे म्हणुन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखान्याचे चेअरमन व प्रशालेचे अध्यक्ष कल्याणराव वसंतराव काळे हे उपस्थित होते.
या वेळी ध्वजारोहण संचालिका संगिताताई सुरेशबापु देठे यांच्या हस्ते पार पडले.यानंतर प्रशालेतील छोटा शिशु ते इयत्ता सातवी पर्यतच्या विद्यार्थ्यांची भाषणे पार पडली. तसेच इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यानी देशभक्तीपर नाटक सादर केले.
यानंतर प्रमुख पाहुणे अध्यक्ष व इतर मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमा नंतर सर्व विद्यार्थ्याना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला.
या ७६ वा प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास व्हाईस चेअरमन भारतनाना कोळेकर कार्यकारी संचालक घोगरे साहेब प्रशालेचे सचिव हनमंत जमदाडे सर्व आजी माजी संचालक मंडळ प्रतिष्ठित नागरिक व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एल काळे सर व प्रशालेतील सर्व सहशिक्षक,सहशिक्षिका यांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जेष्ठ सहशिक्षक एस.एम.चौगुले सर व आभार ए.डी.जाधव यांनी व्यक्त केले.