पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे बाजारडे मोठ्या उत्साहात संपन्न .यावेळी जवळपास ६० हजार रुपयांची उलाढाल झाली.
या बाजारामध्ये विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी बाजारा डे निमित्त विविध प्रकारच्या फळे भाजीपाला खाद्यपदार्थ यांची खरेदी केली. बाजार डे मध्ये पालेभाज्या, वडापाव ,पॅटीस ,दाबेली ,मसाले दूध अशा विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला.
यावेळी उद्घाटन प्रसंगी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान यावे प्रत्यक्ष व्यवहारीक अनुभव यावा यासाठी या बाजाराडेचे आयोजन दरवर्षी विद्यालयामध्ये केले जाते. असे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी सांगितले .यावेळी विद्यार्थ्यांनमध्ये आपली वस्तू विकण्याची धडपड दिसून येत होती .सुट्टे पैसे मोजून घेतले जात होते व दिले जातात अशा बाजारडेमुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची माहिती मिळते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उद्योगपती पद्माकर बागल ,भाजपचे गणेश बागल, संपादक शिवाजी शिंदे ,मनसेचे अनिल बागल, भगवान महाराज बागल,किसान नर्सरीचे दीपक बागल ,प्रगतशील बागातदार प्रभाकर बागल, , हणमंत बागल,गणेश फाटे ,शांतिनाथ कोळी समाधान बागल, प्रमोद बागल, बाजीराव बागल, संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्षा मोरे, ,स्वाती बागल,आश्वीणी फाटे,दीपक देशमुख, लिना बागल ,शीतल बागल, राजेंद्र मोलाणे ,पटेल ,सोमनाथ भूईटे ,दीपक सावंत नियाज मुलाणी,अजय मोरे ,शितल मस्के ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते