आम्ही पुणेकर व सिओ ऑर्गनायझेशन या संस्थेचा जपान मधील स्मारकासाठी पुढाकार
पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
शिवस्वराज्य यात्रा १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ बारा राज्यातून प्रवास करणार आठ हजार किलोमीटर प्रवास करणार आहे. शिव स्वराज्य रथ यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी सातारा सातारा येथून दिनांक 15 जानेवारी रोजी छत्रपती शिवरायांचे वंशज मा. उदयनराजे जी भोसले यांच्या हस्ते मुर्ती पूजन करून यात्रेची सुरुवात करण्यात आली. सातारा नंतर कराड, कोल्हापूर, मालवण, निपाणी, चिकोडी, कुरुंदवाड, शिरोळ, मिरज, मंगळवेढा या मार्गावर जोरदार स्वागत करत सोलापूरमध्ये दाखल झाली.
यावेळी माननीय पुरुषोत्तम बर्डे यांनी या यात्रेची जबाबदारी घेऊन स्वागत केले याचप्रमाणे युवराज चुंबळकर यांनी त्यांच्या वैष्णवी हॉटेल या ठिकाणी यात्रेमधील कार्यकर्त्यांची राहण्याची व सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करून दिली. आज सकाळी दहा वाजता यात्रा हैदराबादच्या दिशेने रवाना झाली या यात्रेचे नेतृत्व उत्तमराव मांढरे मुख्य सल्लागार, सीओ ऑर्गनायझेशन हे करत असून यांच्यासोबत संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, अमर भुतकर, मंगेश मांढरे, नितीन लचके, हे सर्व या पुढील प्रवास हैदराबाद, नांदेड नागपूर भोपाळ ग्वाल्हेर लखनऊ आग्रा दिल्ली पानिपत कुरुक्षेत्र हरियाणा जयपूर अहमदाबाद वडोदरा सुरत मुंबई असा संपूर्ण आठ हजार ते नऊ हजाराचा करणार असून यात्रेचे सांगता मुंबई येथे राजभवन मध्ये राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे..
यावेळी उत्तमराव मांढरे म्हणाले, मागील वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने उभारण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुधीर मुनगंटीवार, राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर शिवाजी महराजांचे प्रेरणा देणारे स्मारक टोकियो येथे अभिमानाने उभा राहणार आहे.
दिनांक ८ मार्च २०२५ रोजी स्मारकाचे लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे . १९ फेब्रुवारी२०२५ रोजी स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे भूमिपूजनासाठी महाराष्ट्रातील अकरा गड किल्ल्यांची माती आणि पाणी नेण्यात येणार आहे. अखिल जपान भारतीय महासंघाचे अध्यक्ष आणि एदोगावा इंडिया कल्चर सेंटर, टोक्योचे संचालक योगेंद्र पुराणिक यांचे सहकार्य स्मारकासाठी मिळाले आहे.