भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील यशश्री अकॅडमीच्या वतीने रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वा 30 मिनिटांनी , यशश्री शैक्षणिक संकुल बायपास रोड भाळवणी येथे लोक व्याख्यानकार प्राध्यापक विशाल गरड यांचे विद्यार्थी जीवनातील दशा आणि दिशा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी भाळवणी पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी पालक विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आव्हान यशश्री अकॅडमीचे संचालक प्रवीण लिंगडे यांनी केले आहे.