पत्रकार आणि पत्रकारितेतील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीर
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालय यांच्यावतीने मोफत नेत्ररोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकारांसह त्यांचे कुटुंबीय आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांना या मोफत शिबिराचा लाभ घेता येणार आहे.
या शिबिरामध्ये मोतीबिंदू, काच बिंदू, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यात मांस वाढलेले असणे अशा प्रकारच्या सर्व तपासण्या मोफत करून त्यावरती मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
*दिनांक :* २९ /१/ २०२५
*वेळ :* स. ११ वा.
*ठिकाण :* सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, सोलापूर