पांढरेवाडी केंद्राची शिक्षण परिषद जि.प.प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेत उत्साहात संपन्न
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
आज पांढरेवाडी केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती केंद्र पांढरेवाडी शाळेत उत्साहात निसर्गाच्या सान्निध्यात संपन्न झाली.सुरुवातीला विद्यार्थी विद्यार्थिनी स्वागतगीत आणि ईशस्तवनाने सुरुवात करत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पूजन केंद्रप्रमुख स्वाती डोंगरे,अध्यक्ष रामदास माळी उपाध्यक्ष प्रवीण कवडे रामचंद्र गायकवाड.अनिल कांबळे.कालिदास कवडे.पाटील सर.सर्जेराव सावंत मुख्याध्यापक किरण ढोबळे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे, बिभीषण वसेकर यांचे उपस्थितीत संपन्न झाले.
प्रास्ताविक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी करत वाफळकरवस्ती शाळेची माहिती सांगत पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगितले.त्यानंतर शिक्षण परिषदेचा मुख्य विषय ICT तंत्रज्ञान यावर सुनिल क्षीरसागर यांनी मार्गदर्शन करत आवश्यक सुचना देत सर्वांनी तंत्रज्ञान अवगत करणे काळाची गरज आहे सांगितले.त्यानंतर संदीप आहेर यांनी घर घर संविधान याविषयावर.सुर्यकांत बनकर यांनी पॅट चाचणीवर मार्गदर्शन करत त्याचे महत्त्व पटवून दिले.त्यानंतर अध्ययन निष्पत्ती कृती आराखडा यावर अतुल भोपळे मार्गदर्शन करत सर्वांनी कृती आराखडा अचूक का भरणे गरजेचे आहे. त्यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.शेवटी स्वाती डोंगरे यांनी प्रशासकीय सुचना दिल्या आणि ऑनलाईन माहिती बरोबर विद्यार्थी गुणवत्ता ही तितकीच महत्त्वाची सांगत सर्व शिक्षकांनी अपडेट राहण्यासाठी तनमनधनानी काम करणे महत्त्वाचे आहे सांगितले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानेश्वर दुधाणे यांनी करत आभार मुख्याध्यापक किरण किरण ढोबळे यांनी मानले.यावेळी पांढरेवाडी केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.