भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे शनिवार दिनांक 1/02/2025 रोजी दुपारी 4 वाजता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला एकपात्री नाटक मी सावित्री ज्योतिराव फुले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या नाटकाच्या सादरकर्त्या जीत फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रा.कविता म्हेत्रे या आहेत.
तरी पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी, विद्यार्थी महिला व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंढरपूर तालुका महिला अध्यक्षा राजश्री ताड यांनी केले आहे.