भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळ वणी येथील श्री शाकंभरी देवी सभा मंडपात आज शुक्रवार दिनांक 24/01/2025 रोजी दुपारी 4 वाजता मकर संक्रातीच्या निमित्ताने महिलांच्या करिता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती शाखा व्यवस्थापक बंडू गोफणे यांनी दिली आहे.
यावेळी परिसरातील महिलाना गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तरी परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी वेळेवर उपस्थित राहावे.असे आवाहन संयोजिका राजश्री ताड यांनी केले आहे.