मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र शासनास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मुख्य सचिव श्रीकरजी परदेशी यांना समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी पंढरपूर येथे संत नामदेव महाराज स्मारक व केशवराज मंदिराचा जीर्णोद्धार तसेच शिंपी समाजातील प्रलंबित विषय, आगामी जुलै महिन्यात संत नामदेव महाराजांच्या 675 वा संजीवन समाधी सोहळा शासकीय स्तरावर भव्य प्रमाणात घेण्याचा व विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज नामदास, ह.भ.प.मुकुंद महाराज नामदास, ह.भ.प.निवृत्ती महाराज नामदास, महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा महेशजी ढवळे ,ॲड. अजय तल्हार , श्रीकेशवराज संस्था नामदेव मंदिर पंढरपूरचे सर्वेसर्वा रुपेश जी खांडके, धनंजय जवंजाळ, पंढरपूर श्री संत नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष गणेश उंडाळे ,विश्वस्त शशिकांत जवंजाळ जयवंत कांबळे ,युवक संघटना पदाधिकारी प्रथमेश परांडकर, जगन्नाथ परदेशी आदि मान्यवर उपस्थित होते.