भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे पत्रकार दिनाच्या निमित्ताने मुस्लिम समाजाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते लुकमानभाई इनामदार यांच्या हस्ते तेज न्यूज चॅनल संपादक प्रशांत माळवदे यांचा शाल,श्रीफळ, फेटा, हार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी उपसरपंच नितीन शिंदे,मन्सूर इनामदार,बिलाल इनामदार आदी उपस्थित होते.
यावेळी लुकमान इनामदार म्हणाले की आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आमच्या परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकाराच्या सत्कारमुळे समाधान झाले.
यावेळी प्रशांत माळवदे यांनी आभार मानले.