पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय नामदेव शास्त्रीय महासंघ नवी दिल्ली संलग्न महाराष्ट्र राज्य पदाधिकारी कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण मीटिंग उद्या शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता श्री केशवराज संस्था श्री संत नामदेव मंदिर श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अँड महेश ढवळे यांच्या अध्यक्षते खाली व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नानासाहेब पाथरकर केशवराज संस्थेचे अध्यक्ष रुपेश खांडके,सरचिटणीस धनंजय जवंजाळ, व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण मीटिंग चे आयोजन करण्यात आलेले आहे.
मीटिंगचे महत्वपूर्ण विषय
महाराष्ट्र शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या “श्री संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ” आयोजित विषयावर सविस्तर चर्चा विनिमय करून पुढील कार्यवाही करण्यात येईल श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जन्मस्थान श्री नामदेव मंदिर पंढरपूर संगोपन दुरुस्ती या विषयी श्री केशवराज संस्थेच्या पदाधिकाऱ्यासोबत चर्चा विनीमय करून निर्णय घेणे.
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे “श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे स्मारक” उभारणे या बाबत शासकीय पाठपुरावा करण्यासाठी निर्णय घेण्यात येईल
अ भा नामदेव क्षत्रिय महासंघाच्या संघटन वाढीसाठी महाराष्ट्राचा दौरा करून संघटनेचा विस्तार करण्याची रुपरेषा ठरविणे
केंद्र व राज्य शासनाकडे शिंपी समाजाच्या प्रलंबित मागण्यांविषयी महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून याविषयी चर्चा विनिमय करून निर्णय घेणे ,जुलै २०२५ मध्ये श्री संत नामदेव महाराजांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा पंढरपूर येथे भव्य प्रमाणात घेण्याबाबत चर्चा व निर्णय ,भारतातील समस्त शिंपी समाजाची जनगणना व संघटन शक्ति साठी लवकरच श्री क्षेत्र पंढरपूर येथे गाव, शहर ,तालुका, जिल्हा, राज्याचे समाज अध्यक्ष असलेल्या समाज अध्यक्षांचे संमेलनाचे आयोजन करणे.
तरी या मिटींगला अ भा नामदेव क्षत्रिय महासंघ महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, व श्री केशवराज संस्था व संलग्नित संस्था अध्यक्ष यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सचिव महादेवराव खटावकर राज्य संघटक मनोज भांडारकर पंढरपूर समाजाध्यक्ष गणेश उंडाळे जिल्हा अध्यक्ष राजेश धोपटे प्रसिद्धीप्रमुख संतोष मुळे यांनी केले आहे.