सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री.उद्योग वर्धिनी वृद्धाश्रमास लायन्स क्लबचे सेंट्रल अध्यक्ष चक्रधर अन्नलदास यांनी आपल्या मातोश्री कै अनुसया केशव अन्नलदास यांच्या स्मरणार्थ, लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल च्या वतीने मोफत अन्न व धान्य दान दिले.
या प्रसंगा अनुसरून उद्योगवर्धिनी अध्यक्ष चंद्रिका चौहान म्हणाले म्हणाले की, अन्नदास परिवार व लायन्स क्लबला मी मनापासून धन्यवाद देते. या पुढील काळातही लायन्स क्लब कडून सहकार्य करण्यात येईल असे क्लब कडून सांगण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी उद्योगवर्धिनी वृद्धाश्रम च्या अध्यक्षा चंद्रिका चौहान ,लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल चे अध्यक्ष चक्रधर अन्नलदास, खजिनदार लायन प्रा स्वामीनाथ कलशेट्टी ,ऍडव्होकेट श्रीनिवास कटकुर, यशवंत इंदापुरे, सौ पार्वती अन्नलदास, तेजस अन्नलदास, गौरी आमडेकर, गीतांजली चौहान आदींची उपस्थिती होती बहुमोल सहकार्य केल्याबद्दल मार्गदर्शक चंद्रिका चौहान मॅडम व सहकाऱ्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी व एमबीए विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.सदर कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन श्रीनिवास कटकर यांनी केले.