सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेली आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट मिळावी खंडणे सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राच्या जेष्ठ व वयोवृद्ध संपादकांना दर महा वीस हजार रुपये पेन्शन इत्यादी विषयासह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलने उपोषणे निवेदने त्याच बरोबर राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे
पत्रकार सुरक्षा समिती व दैनिक तुफान क्रांती परिवार वतीने सत्कार
मिर्झागालिब मुजावर हे सांगोला तालुक्यातील असून दैनिक तुफान क्रांती चे संपादक आहेत त्यांचा पत्रकारिता मध्ये दांडगा अभ्यास असून महाराष्ट्र राज्यात दैनिक तुफान क्रांती चे अनेक पत्रकार आहेत मिर्झागालिब मुजावर यांनी सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य माणसांच्या तसेच वंचित पिढीत घटकाच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या दैनिक तुफान क्रांती या वृत्तपत्राच्या माध्यमातून सरकारी पातळीवर आवाज उठवला आहे जनसामान्य माणसांचा आवाज म्हणून दैनिक तुफान क्रांती चा प्रशासनात चांगलाच दबदबा असून धारदार लेखणी साडेतोड बातमीच्या माध्यमातून दैनिक तुफान क्रांती ने राज्यात आगळा वेगळा वाचक वर्ग निर्माण केला आहे. राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दैनिक तुफान क्रांती ने वेगळाच ठसा उमटवला आहे असे प्रतिपादन प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केलं आहे
पश्चिम महाराष्ट्र मधील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिवाचे रान करणार
पश्चिम महाराष्ट्र मधील सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा व पुणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आपण प्रशासन दरबारात आक्रमक भूमिका घेऊन पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिवाचे रान करणार असल्याचे नूतन महाराष्ट्र संघटक मिर्झा गालिब मुजावर यांनी सत्कार प्रसंगी सांगितले
मिर्झागालिब मुजावर यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या नूतन पदाधिकारी 2025 साठी पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी नियुक्ती करण्यात आली असून सांगोला येथे दैनिक तुफान क्रांती वृत्तपत्राच्या कार्यालयात मुजावर यांचा पत्रकार सुरक्षा समिती व दैनिक तुफान क्रांती परिवार वतीने मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
यावेळी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद दैनिक तुफान क्रांती चे उपसंपादक जावेद आत्तार अशोक भोसले राहुल कुलकर्णी नंदकुमार गायकवाड राहुल पवार तन्वीर मुजावर यांनी मिर्झा गालिब मुजावर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.