पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघाचे नूतन आमदार राजाभाऊ खरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांनी सत्कार केला आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षकडून आमदार राजाभाऊ खरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांचा आ.राजाभाऊ खरे यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. यामुळे खरे यांचे राजकीय वजन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
आ. राजाभाऊ खरे यांनी आपल्या आमदारकीसाठी मागील अनेक वर्षपासून जनतेला मोठी मदत करीत जनतेमधून आपली सहानुभूती वाढविली होती. त्यामुळे मोहोळ मतदार संघातून एकतर्फी होणारी निवडणूक आ.राजाभाऊ खरे यांनी मोठ्या मताधिक्याने जिंकली आहे.
आ. राजाभाऊ खरे याचे गोपाळपूर येथील फार्महाऊस याठिकाणी जावून नागेशदादा फाटे यांनी शाही सत्कार केला आहे.