पुणे प्रतिनिधी सुभाष मुळे तेज न्यूज
संत नामदेव महाराज रथ व सायकल वारीवर प्रतिक्षा धोंगडे यांनी गायलेल्या
*मेरे बाबा नामदेव का बडा बोल बाला |*
*देखो, चले घुमान बाबा का मेला ||*
*नामदेव नामदेव बाबाजी नामदेव || धृ ||*
या गीताची रचना करणारे श्री. सुधाकर मेहेर, (पिंपरी, पुणे मो.नं. 9822047338) तर संगीतकार श्री. हरीश धोंगडे, (वारजे पुणे मो.नं. 96231 03444) यांना बुधवार पेठ, पुणे या संस्थेचे अध्यक्ष कैलास देवळे व चिटणीस डाॅ. लक्ष्मण कालेकर यांचे हस्ते पुणे मुक्कामी वारीत विशेष सन्मानित करण्यात आले.
यावेळी भागवत धर्म प्रसारक मंडळाचे खजिनदार मनोज मांढरे, नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, रणजित माळवदे, विजय कालेकर, राजेंद्र भुतकर, ना.स.प. पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदीप लचके, प्रदिप खोले, सुभाष मुळे, प्रशांत सातपुते, सुभाष पांढरकामे, सोमनाथ मेटे, कुंदन गोरटे, अक्षय मांढरे, राहुल सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती
शिरोमणी नामदेव महाराज ७५४ वी जयंतीचे औचित्य साधून शांती, समता आणि बंधूता या भागवत धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी पालखी सोहळा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, भागवत धर्म प्रसारक मंडळ, नामदेव समाजोन्नती परिषद, महाराष्ट्र राज्य, श्री नामदेव दरबार कमेटी, घुमाण पंजाब याचे संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण या संत नामदेव महाराज रथ व सायकल वारी बुधवार दि . १३ रोजी पुणे शहरात आगमन झाले. या संत नामदेव महाराज रथ व सायकल वारीवर नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेच्या संकल्पनेतून संजय नेवासकर, डाॅ. अजय फुटाणे, मनोज मांढरे, संदीप लचके, सुभाष मुळे यांचे मार्गदर्शनाखाली प्रस्तुत केलेले गीत प्रतिक्षा धोंगडे यांनी गायले असून प्रथमेश धोंगडे यांनी ध्वनिमुद्रित तर बापू ननावरे संगीतबद्ध केले आहे. या गीतास समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ कसबा पेठचे विश्वस्त रमेश मेहेर यांचे सहकार्य व आर्थिक पाठबळ लाभले.
या कार्यक्रमास पुणे शहर शाखेचे पदाधिकारी रमेश हिरवे, प्रशांत भोंडवे, राहुल सुपेकर, स्वप्निल खुर्द, नितीन लचके, शिवाजी माळवदकर, मदन लंगडे, पंकज सुत्रावे, गायत्री लचके, कविता खोले, शोभा मुळे, विजया कालेकर, वंदना मेटे, रूपा माळवदकर, वर्षा माळवदे तसेच श्री नामदेव शिंपी समाज पुणे लष्कर चे संजय लचके, मुरारी हिरवे, अरुण भांबुरे, नितीन भाकरे, अशोक हिरवे, सुजय खोले, अजय कळसकर, राजू बाकरे स्वाती लचके, दिपा लचके यांच्या सह पुणे शहरातील बहुसंख्य ज्ञातीसंस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, वारीतील सायकल स्वार, वारकरी, समाज बांधव समाज बंधू भगिनी व नामदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.