सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आज दिनांक १८ डिसेंबर रोजी उत्साहात साजरा झाला.यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचा पर्यावरण हा मुख्य विषय होताच पण त्याबरोबर पॅरलाम्पिक गेम्स, मोबाईल थीम, एक भारत श्रेष्ठ भारत, लोककला व संस्कृतीने परिपूर्ण असे नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच इतर अनेक रंगतदार कार्यक्रमाने स्नेहसंमेलन आकर्षक झाले.
या वार्षिक स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष पद श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्षस्थानी मा. श्री धर्मराजजी काडादी ,शिक्षण संकुलाचे विश्वस्त माननीय डॉ. राजशेखर येळीकर सर हे होते तसेच प्रमुख अतिथीपदी मा.सौ. दिपाली काळे (पोलीस उपायुक्त) तसेच माजी मुख्याध्यापिका सौ अंजली तिवारी यांनी भूषविले तसेच अध्यक्षस्थानी माननीय मुख्याध्यापक मा श्री योगेश राऊत सर , पर्यवेक्षिका सौ नीता तमशेट्टी , ज्येष्ठ शिक्षिका रेणुका अरोरा पालक शिक्षक संघाच्या प्रमुख मा.सौ धनश्री काटकर सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम च्या सांस्कृतिक विभागप्रमुख सौ. विजया बिराजदार विद्यार्थी प्रतिनिधी आयुष जाधव व अक्षरा पाटणकर उपस्थित होते. प्रमुख अतिथींनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक करीत अभ्यासाबरोबर इतर कलागुणांनाही वाव द्यावा .असे विशेषत्वाने नमूद केले. यावेळी संस्थेचे इतर शाखेतील मुख्याध्यापक,पर्यवेक्षक पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अतिशय सुव्यवस्थितरित्या सादर केले. आदर्श विद्यार्थिनी म्हणून कु. समृद्धी कोळेकर व आदर्श विद्यार्थी म्हणून सुरज अंबूरे यांची निवड करण्यात आली.
पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरणही याप्रसंगी करण्यात आले. सांस्कृतिक विभाग सदस्य सौ विजयालक्ष्मी सुरपुरे,श्रुती कुलकर्णी, सौ प्रतिमा ठाकूर सौ कविता बिराजदार यांचे सहकार्य लाभले.