भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील ज्येष्ठ छायाचित्रकार (फोटोग्राफर) व साप्ताहिक युवा राष्ट्र चेतना चे संपादक जैनुद्दीन मुलानी यांचा तेज न्यूज परिवाराच्या संपादक प्रशांत माळवदे यांच्या हस्ते वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी मुलानी म्हणाले की आपल्या तेज न्यूज चॅनल परिवाराकडून ग्रामीण भागातील सर्वात जलद गतीने बातमी प्रसिद्ध करणारे सोशल मीडिया आहे. डिजिटल मिडिया चा उपयोग करून नवनवीन बातम्या प्रसिद्ध केल्या जातात.तेज न्यूज चॅनलच्या उदंड प्रगतीस आमच्या हार्दिक शुभेच्छा असेही मुलानी म्हणाले.
यावेळी संपादक जैनुद्दिन मुलानी यांनी साप्ताहिक युवा राष्ट्रचेतनाचा दिवाळी विशेषांक भेट देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.