सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब सोलापूर सिटीच्या वतीने आयोजित दंत शिबिर आदर्श माता व्यंकवाबाई बत्तूल माध्यमिक विद्यालय सोमवार पेठ सोलापूर येथे संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष लायन मोहन भूमकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच डॉक्टर विनोद चव्हाण दंत तपासणी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री पिंटू महाले समाजसेवक, श्री बाळकृष्ण पतंगे उद्योजक,, मुख्याध्यापक श्री प्रमोद बत्तूल सर, श्री राजूसा शालगर, उद्योजक , श्री चन्नाबसू माळगे , श्री उद्योजक, शरणप्पा भुयारे, लायन सोमशेखर भोगडे, सचिव लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटी शिक्षक, शिक्षिका,विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमांची सांगता झाली.