सुनंदाताई घोडेकर आणि आमची ओळख जून २०२४ मध्ये झाली.विशेष म्हणजे पहिले आम्ही दोन्ही परिवार एकमेकांस ओळखत नव्हतो.पण जून मध्ये सूनंदाताईंची कन्या ज्योती हीचा वाढ दिवस आणि त्यांची नात दोघींचीही birthday एकाच दिवशी होता.आम्ही ज्या traveller गाडीने मुंबईला येणार होतो त्याच गाडीने सुनंदा ताईंचे अनेक नातेवाईक birthday संपवून दुपारी निघणार होते.
Birthday निमित्त गाडी त्यांच्या बंगल्यात ट्रॅव्हल्स वाल्याने ऊभी केली...त्यावेळी मी आणि पत्नी योगिता आणि आमची दोन्ही मुलं गार्गी व व प्रियांस असे चौघेही त्यांच्या वाढदिवसात सामील झालो.नेहमीप्रमाणे पत्नी योगिता आणि मी आम्ही गाणी म्हणून त्यांना वाढ दिवसाच्या छान शुभेच्छा दिल्या.आम्ही गायलेली गाणी खूप छान असल्याने घोडेकर कुटुंबियांना खूप आनंद झाला ते म्हणाले हिरवे तुम्ही पती पत्नी दोघांनीही अमच्या birthday ला चार चाँद लावले.त्या दिवसापासून आमची ओळख आणखी वृध्दींगत होत गेली.
आज माझा मावस भाऊ धनंजय बागडे पुण्याहून मला भेटायला घोडेगाव ला आला होता तेव्हा आम्ही दोघे घोडेकर कुटुंबियांच्या घरी भेट देऊन त्यांचेकडे स्ट्रॉबेरी शेत पाहण्याची इच्छा व्यक्त करताच सुनंदा ताईंनी त्यांचे नातलग सन्मा डोके साहेब यांना अमच्या बरोबर शेत पाहण्यास पाठविले. डोके यांनी देखील आम्हा दोघांस तुम्हाला पाहिजे तेवढी स्ट्रॉबेरी तोडून खा असे सांगितले, तेव्हा आम्ही आमच्या हाताने स्ट्रॉबेरी तोडून खाल्ली आणि आम्हाला खूप आनंद झाला.मुंबईत सिमेंटच्या जंगलात आणि प्रदूषणात असे शेतात फिरण्याचे सुख मिळत नाही.पण आज घोडेकर परिवाराच्या पुढाकाराने आम्ही ते रिअल सुख अनुभवले आणि आमचा आनंद गगनात मावेनासा झाला.
आम्ही बऱ्यापैकी स्ट्रॉबेरी खाल्ली , डोके यांनी देखील शेतातील इतर पिकांची माहिती आम्हाला देऊन घोडेकर कुटुंबीयांचा असलेल्या झाडांची नर्सरी आम्हाला दाखवत अनेक रोपांची माहिती दिली.
घरी निघताना माझा मावस भाऊ धनंजय आणि मला स्ट्रॉबेरी बॉक्स मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने घरी नेण्यास भेट दिले.वांगी, मिरच्या, झेंडू अशी रोप लावण्यासाठी दिली.
एकंदर दोन तास आमचे कसे गेले कळले सुद्धा नाही.एक मात्र खर आहे की शेतकरी(बळीराजा) वर्षभर मेहनत घेतो तेव्हाच आपण अन्न खाऊ शकतो.त्याची पीक पिकविण्याची मेहनत आपल्या म्हणावी तशी लक्षात येत नाही.तेव्हा बळीराजाला त्याचा सन्मान द्यायलाच लागेल.बळीराजा जगला तर प्रजा जगेल..बळीराजा संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे.त्याला शत शत नमन आणि सुनंदाताई आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीय यांचे सुद्धा मनापासून आभार...
गणेश हिरवे ,जोगेश्वरी मुंबई
9920581878