जोगेश्वरी पूर्व गणेश हिरवे
वांद्रे मुंबई येथील सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल येथे नुकतीच ख्रिसमस पार्टीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने शाळेतील आणि चर्च मधील धर्मगुरू (फादर) असे साधारण शंभरहून अधिक जण उपस्थित होते.
सर्वप्रथम सर्वांचे ख्रिसमस आकर्षण असलेली सांताक्लाज ची रेड कॅप देऊन आणि बॅज देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिक्षक आणि उपस्थितांसाठी मनोरंजन आणि टास्क गेम्स चे आयोजन तसेच अनेकांना विविध गोष्टींसाठी ऑन दि स्पॉट बक्षिसे देण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी आणि चर्चे मॅनेजर फादर हेन्री यांच्या शुभहस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.डिसेंबर मध्ये जन्मलेल्या शाळेतील शिक्षकांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.शिक्षकांना स्वादिष्ट नाश्ता आणि रुचकर जेवण व आईस्क्रीम देण्यात आले.एकंदर सर्व स्टाफ खूप आनंदात आणि उत्साहात सर्वांशी मौजमजा करताना दिसला.
यावेळी शाळेच्या पार्लरमध्ये खास ख्रिसमस क्रीब उभारण्यात आले होते तर शाळेच्या बिल्डिंग ला विद्युत रोषणाई कंदील लावण्यात येऊन संपूर्ण परिसर विविध ख्रिसमस च्या गोष्टींनी सजविण्यात आला होता.शाळेतील प्राथमिक विभागातील शिक्षका पर्ल डिसोजा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खास शैलीत केल्याने कार्यक्रम दणक्यात साजरा झाला.
यावेळी पालक शिक्षक संघातर्फे शिक्षकांना नाताळ सणा निमित्त भेटवस्तू वितरीत करण्यात आल्या.तर शाळेतील साधारण के जी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नाताळ निमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आल्याने बच्चे कंपनी पण खुश दिसली.