पंढरपूर प्रतिनिधी तेज न्युज
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील MIT परिवाराकडून प्राचार्य डॉ. स्वप्नील सेठ यांच्या हस्ते तेज न्युज परिवाराचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. स्वप्नील सेठ म्हणाले की ग्रामीण भागातील आपले न्युज चैनेल असून ही सर्व माहिती तात्काळ प्रसिद्ध केली जाते. आपली बातमी म्हणजे सत्य परिस्थिती लक्षात घेऊन केलेली असल्यामुळे वाचकाच्या मनात विचार व विश्वास निर्माण झालेला आहे. या पुढील काळात ही वाचकाचा उदंड प्रतिसाद मिळत राहो हीच शुभेच्छा.
यावेळी देशपांडे सर,तानाजी सर,दुनाखे सर,किरण रणदिवे सर,बावसकर सर,सोनटक्के सर,आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी सर्वांचे आभार संपादक प्रशांत माळवदे यांनी मानले.