भाजपला पाठिंबा देण्याचा सर्व अधिकार शेकापचे नेते जयंत पाटील यांना आहेत.
सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
शेतकरी कामगार पक्षाने कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने भाजपच्या पाठिंबा बाबतची चर्चा आहे ती खोटी असून मला बदनाम करण्याचा कट असल्याचे मत शेकापचे नूतन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
सध्या मुंबईमध्ये सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडीला उधान आले असून त्यामध्ये सांगोल्याचे नूतन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी भाजपला पाठिंबा दिला असल्याचे इलेक्ट्रॉनिक मिडीयावर सांगण्यात येत आहे. त्याबाबत बोलताना आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मत व्यक्त केले.