पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनप्रवासावर आधारित 'कर्मवीरायण' हा चित्रपट कर्मवीरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ट्रान्स एफेक्स स्टुडिओकडून तयार करण्यात आला आहे.या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट येथे (दि. २७) रोजी पार पडले.
शैक्षणिक जडणघडणीमध्ये कर्मवीरांचे उत्तुंग योगदान आहे. महापुरुषावरील चित्रपट पाहून नक्कीच प्रेक्षकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास भावलेकर यांनी व्यक्त केला.
या स्क्रीनिंगसाठी मॉरिशसमधील विविध क्षेत्रांतील प्रेक्षक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशसचे संचालक डॉ. व्ही. कुंजल, एमजीआयचे माजी विभागप्रमुख डॉ. एम. कुंजल, मराठी साहित्य परिषद अध्यक्ष मॉरिशस भालचंद्र गोविंद जगताप, मराठी साहित्य परिषद मॉरिशस उपाध्यक्ष डॉ. होमराजन, भवानी मंदिराचे अध्यक्ष नितीन बापू उपस्थिती लावली होती.
मराठी विभागाच्या प्रमुख निशी हिरूलक्ष्मण यांनी आभार आणि सूत्रसंचालन केले. चित्रपटाच्या संशोधन समितीचे प्रमुख महावीर जोंधळे, लेखिका इंदुमती जोंधळे, पटकथा लेखक अनिल सपकाळ, क्रिएटिव हेड सावनी वि, माजी मुख्याध्यापिका विनीता नगरकर आणि दिग्दर्शक धनंजय भावलेकर यांची उपस्थिती होती.