जयसिंगपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या वतीने रविवार, दि. १ डिसेंबर रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती महासंघाचे शिरोळ तालुकाध्यक्ष सुरेश पुकाळे यांनी दिली आहे.
सोहळ्यास दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने सुरुवात होणार आहे.यानंतर दिंडी व पालखी सोहळा होणार आहे. तुलशी ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. मिरज येथील पूजा कोपार्डे यांचे नारदीय कीर्तन होणार आहे. त्यानंतर विवेका पुकाळे, अनुष्का भस्मे यांच्या कथ्थक नृत्यातील गणेश वंदना होईल. तसेच अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या कोल्हापूर व सांगली जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास महासंघाचे अध्यक्ष डॉ. नारायणराव पाथरकर, सचिव महादेव खटावकर, भक्ती संप्रदाय संघ पुणेचे अध्यक्ष रामकृष्ण बागडे, डॉ. अभिमन्यू खटावकर, महेश काकडे, पांडुरंग दाभोळे, भारत कोळेकर, बाळासाहेब आंबेकर, प्रदीप कळसकर, रमेश भिंगे, अश्विनी वायचळ, नंदकुमार कोसबतवार, सुनील होमकर, संतोष मुळे, भिकाजी गाणबावले उपस्थित राहणार आहेत.