मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
गांधी बाल मंदिर हायस्कूल कुर्ला चे एन सी .सी .कॅडेट एक भारत श्रेष्ठ भारत कॅम्प साठी नुकतेच जळगाव येथे रवाना झाले.
१४ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील एक भारत श्रेष्ठ भारत या कॅम्प साठी बाल मंदिर हायस्कूल कुर्ला ३ महाराष्ट्र बटालियन आर्मी विंग चे कॅडेट राणाजी इंगळीकर,अभय साळुंखे ,रोशन आरोटे ,ओंकार गांगुर्डे,पार्ले टिळक हायस्कूल चे काही कॅडेट देखील त्यांचे सोबत जळगावला गेले आहेत.
यावेळी ३ महाराष्ट्र बटालियनचे आर्मी ऑफिसर विश्वनाथ सिंग व एनसीसी ऑफिसर विश्वनाथ पांचाळ, पालक वर्ग उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.