सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टीन सिटीचे लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीच्या वतीने कष्टकरी महिलाना दिवाळी निमित्त फराळ आणि साडी वाटप संपन्न झाला.यावेळी मान्यवरांचा हस्ते संस्थापक अध्यक्ष, शिक्षण कॅबिनेट ऑफिसर लायन नागेश बुगडे, एम.जे.एफ लायन ममता बुगडे, यांनी स्वागत केले. झोन चेअरमन लायन सौ नंदिनी जाधव,क्लबचे सचिव लायन सोमशेखर भोगडे, खजिनदार लायन प्रभाकर जवळकर,लायन सागर पुकाळे, सहसचिव लायन राजेश परसगोंड, सचिव निर्मिती साकुरा श्री महेश देवणगांव , श्री प्रविण बुसे॑, श्री अमित जैन, सौ ज्योती गाडे, सौ शुभांगी चवरे,यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवाळी निमित्त फराळ, साडी वाटप करण्यात आला.
निर्मिती संकुरा अपार्टमेंट मधील घरकाम करणाऱ्या महिलांना साडी व फराळ वाटपाचा कार्यक्रमात फाराळ आणि साडी वाटप करण्यात आले आहे.निर्मिती सकुंरा अपार्टमेंट क्लब हाऊस येथे संपन्न झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. शेवटी आभार सचिव लायन सोमशेखर भोगडे यांनी केले.