सोलापूर जिल्ह्यात १५,१८ आणि १९ ऑक्टोबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजासह वादळी वारा
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
भारत हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई यांचे कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक १५ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर, २०२४ दरम्यान आकाश अंशता: ढगाळ राहील. दिनांक १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर, दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक १८ आणि १९ ऑक्टोबर २०२४, रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
कमाल तापमान २७.० अंश सेल्सिअस ते २८.० अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस ते २२ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता ८४ ते ८६ % तर दुपारची सापेक्ष आद्रता ५० ते ५२ % दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वार्याचा वेग ताशी ०२ किमी ते १० किमी पर्यन्त राहण्याची शक्यता आहे ईशारा
सोलापूर जिल्ह्यात दिनांक १५,१८ आणि १९ ऑक्टोबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजासह वादळी वारा (३० ते ४० कि.मी./तास), हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.कृषि विज्ञान केंद्र यांच्या कडून सांगण्यात आले आहे.