सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन क्लब ऑफ सोलापूर मॅट्रो व अस्ट्रोकिड्स नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने सिध्येश्वर मंदिरातील अन्नछत्रातील स्वयपाक करणाऱ्या होतकरू महिलान समवेत दीपावली साजरी करण्यात आली. त्यांना साडी ब्लाउज़ अभ्यंग स्नानाचे किट देण्यात आले त्यामध्ये ( साबण ब्रश पेस्ट ऑइल बॉटल शँपो शिकेकाई ) व मिठाई देऊन पणत्या लाऊन दीपावली साजरी केली.
त्यावेळी लायन अध्यक्षा शलाका कुलकर्णी, सेक्रेटरी लायन विश्वनाथ आमने , लायन सुजाता आमने, लायन अशोक भांझे, लायन विश्वनाथ आवटे, अस्ट्रो किड्स नर्सरीच्या संचलिका राजेश्वरी भादुले अन्नछत्रातील ५० महिला व पाहुणे डॉ.भीमाशंकर बिराजदार,ॲड.पाटील महाराष्ट्र बहुजन सन्मान पार्टीचे मारुती केसकर हजर होते.