सर्वच तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये पंढरपूर तालुक्यात जळोली शाळेचे वर्चस्व
समूहगीत.समूहनृत्य कथाकथन.निबंधलेखन.वक्त्तृत्व या सर्व स्पर्धांमध्ये पटकावले नंबर
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूर आयोजित पंढरपूर पंचायत समिती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली शाळेने घवघवीत यश संपादन करत पंढरपूर तालुक्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून वैयक्तिक स्पर्धेत त्यामध्ये कथाकथन लहानगट स्पर्धेत कु श्रेया महादेव नरसाळे तर मोठा गट सायली शिंदे हिने द्वितीय क्रमांक पटकावला निबंध स्पर्धेत मोठा गट कु उपासना अमोल नरसाळे हिचा द्वितीय तर वक्तृत्व स्पर्धेत मोठा गट द्वितीय क्रमांक स्वरांजली सुनिल नरसाळे मिळवत सामुहिक स्पर्धेमध्ये सुध्दा मोठ्या गटात समूहगीत गायन स्पर्धेत प्रथम तर लोकनृत्य मोठा गटात द्वितीय क्रमांक मिळवत समूहगीतात निबंध.वक्तृत्व.कथाकथन.यामध्ये सोलापूर जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेत निवड झाली असून पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली शाळेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.व्यक्तिमत्व विकासाबरोबरच गुणवत्ता ही तितकीच उत्तम असून सर्व शिक्षक एकदिलाने काम करत आहेत.लवकरच क्रिडा स्पर्धेचीही तयारी सुरू केली आहे.खरोखरच हे यश पाहता विद्यार्थीनां श्रीमती देवकी कलढोणे-दुधाणे मॅडम यांचे अथक परिश्रम व अनमोल मार्गदर्शन लाभले. पंढरपुर तालुका पंचायत समिती कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे साहेब,स्पर्धा केंद्रप्रमुख काळुंके साहेब केंद्रप्रमुख पा.वा.जाधव साहेब.जळोली गावाचे मा.सरपंच.जोतिराम मदने,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब नरसाळे.उपाध्यक्ष शहाजी नरसाळे.स्थानिक संस्था प्रतिनिधी समाधान काका नरसाळे, ज्येष्ट नेते कांतिलाल नरसाळे,संतोष नरसाळे.सर्व ग्रामस्त,माता पालक यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांचे अभिनंदन करत जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.हे यश प्राप्त करण्यासाठी मुख्याध्यापक गणपत मोरे सर.सोमनाथ पवार सर.रमेश खारे सर.अभिमन्यू लोंढे सर.शिवाजु गोरे सर.कैलास नरसाळे सर.देवकी कलढोणे -दुधाणे मॅडम यांनी अधिक परिश्रम घेतले.