सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी येथील एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी (ता. 19) आविष्कार स्पर्धा 2024 पार पडली. यात पाच शाखेमधून 49 प्रकल्प सादर करण्यात आले. यात जवळपास 160 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यातील निवड झालेले प्रकल्प विद्यापीठस्तरीय स्पर्धेस पाठवली जाणार आहेत.
आविष्कार स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक नागनाथ कोनापुरे, नागेश पाथरुटकर यांच्या हस्ते झाले. यावेळेस संस्था सचिव संजय नवले, प्राचार्य डाॅ. शंकर नवले, उपप्राचार्य रवींद्र व्यवहारे, डाॅ. शेखर जगदे, डाॅ. प्रदीप तापकीरे, डाॅ. विजय बिराजदार प्रा. सुनिल शाखापुरे, प्रा. एच टी गुरमे यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक वृत्तीला चालना देण्यासाठी आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन केले जाते. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी आविष्कार या महाविद्यालयस्तर संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या आविष्कार स्पर्धा घेण्यात आल्या आहेत.
मॅकेनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अॅड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अशा पाच शाखेतून जवळपास 160 विद्यार्थ्यांनी या आविष्कार स्पर्धेत हिरीरीने सहभाग नोंदवला. यात सोलर वाहन, वैद्यकीय ॲपलिकेशन, सोलर पॅनल स्वच्छता मशीन, एअर पोल्यूशन डिटेक्शन अॅड कंट्रोल सिस्टीम, सीएनजी अॅड इलेक्ट्रिकल हायब्रिड बाईक, ऑनलाईन चॅटबाॅट बेस्ड टिकेटींग सिस्टीम, व्हेईकल पार्किंग ऑटोमेशन, व्हर्चुअल डेस्कटाॅप असिस्टंट, ड्रोन बेस्ड द विष्णू वाहन आदी प्रकल्प सादर केली. यातील निवडक प्रकल्प विद्यापीठस्तरीय स्पर्धेस पाठवली जाणार आहेत.
परिक्षण आणि आमंत्रित व्यक्तींच्या प्रश्नाला स्पर्धेक विद्यार्थ्यांनी समर्पक उत्तरे दिली. प्रांजल शिंदे, प्रणोती शिंदे, साक्षी नामदे यांनी सोलर वाहन, मेडिकल ॲप्लिकेशन्सबाबत तेजस हुच्चे, सुशांत खांडेकर, ओंकार कमरेड्डी, प्रसाद कबाडे, सोलर पॅनल क्लिनिंगमशीन विषयी प्रगत जाधवर, सुजित करडे, प्रथमेश चौरे, आकाश मोरे, एअर पोल्यूशन डिटेक्शन अॅड कंट्रोलविषयी संकेत गुरव आणि हर्षवर्धन भोसले यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन सृष्टी नवले, श्रेयस आडम तर आभार प्रा. सुनिल शाखापुरे यांनी मानले.