पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पदाधिकारी संवाद बैठक सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी चाकण येथे पार पडली व्यापारी आघाडीचे अध्यक्ष जयप्रकाश सातव पाटील यांच्या सूचनेनुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष विकास दादा जगताप यांनी ऑनलाईन द्वारे सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच सरचिटणीस सिद्धेश हिरवे यांनी सर्वांची मते जाणून घेऊन आघाडीची पुढील कार्य सर्वांसमोर मांडले.
या बैठकीचे आयोजन भालचंद्र निखळ यांनी केले होते या बैठकीसाठी सिद्धेश हिरवे, हेमंत वाव्हळ, संजय जाधव हरीश कोकणे, निखिल गाटे, गणेश नांगरे, दिलीपराव कुलकर्णी, ओंकार तापकीर, चंद्रशेखर लोणकर, अमित वाघोलीकर, मनोज कांकरिया, भालचंद्र निखळ, अंकित भगत, अविनाश दत्तात्रय शिंदे आदींसह व्यापारी पदाधिकारी उपस्थित होते. सुदर्शनजी दुगड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.